टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांना पर्यायी कूपन
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वच टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांची चणचण निर्माण झाली होती. या सुट्ट्यापैशांची अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय 5 ते 100 रूपयांपर्यतच्या कुपनचा पर्याय आणणार आहे.
मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वच टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांची चणचण निर्माण झाली होती. या सुट्ट्यापैशांची अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय 5 ते 100 रूपयांपर्यतच्या कुपनचा पर्याय आणणार आहे.
नोटाबंदी निर्णयानंतर जाहीर करण्यात आलेली टोल माफी उद्यापासून म्हणजेच 2 डिसेंबरपासून सूरू होत आहे. टोल भरतांना या कुपनसचा वापर केला जाणार आहे. उरलेले सुट्टे पैसे म्हणून टोलधारक हे कुपन्स ग्राहकांना परत करतील. पेट्रोल पंपावर देखील 500 च्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय उद्यापासून रद्द करण्यात आला आहे.