माझ्याबद्दल अफवा पसरविल्या जात आहेत - नारायण राणे
माझ्याबद्दल ज्या काही बातम्या पसरविल्या जात आहेत. मला बदनाम करण्यात येत आहे. या सगळ्या अफवा आहेत. काँग्रेसमधील काही नेतमंडळी हे कटकारस्थान केले जात आहे, अशी रोखठोक नारायण राणे यांनी मांडली
मुंबई : माझ्याबद्दल ज्या काही बातम्या पसरविल्या जात आहेत. मला बदनाम करण्यात येत आहे. या सगळ्या अफवा आहेत. काँग्रेसमधील काही नेतमंडळींकडून हे कटकारस्थान केले जात आहे, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मांडली. त्यांनी अन्य पक्षात प्रवेश करण्याबाबत वृत्ताला पूर्णविराम दिला.
माझ्याबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत, त्या चुकीच्या आहे. मी शिवसेनेत, कधी भाजपमध्ये जातोय अशा बातम्या येत आहे. चालू आहेत. माझ्याबद्दल चुकीचा बातम्या पसरविण्यात येत आहे. या बातम्या पेरण्यामागे काँग्रेसचे काही नेत्यांचे षडयंत्र सुरु आहे. मात्र, माझ्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. राणे यांचा संघर्ष करणे हा पिंड आहे. त्यामुळे यापुढेही संघर्ष करत राहणार, असा इशारा राणे यांनी बातम्या पसरविणाऱ्यांना दिलाय.
काँग्रेस सोडणार असल्याची अफवा आहे. कुठल्याही पक्षात जाणार नाही. मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणजे त्याचा अर्थ मी भाजपात जाणार असा होत नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला डावलले जात आहे, असा थेट हल्लाबोल राणे यांनी केला.
नितेश राणे हे आक्रमक आहेत. कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. ती भूमिका योग्य आहे. जर त्यांना याबाबत निलंबित केले तर मला काहीही वाटत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तसे झाले तर मला वाईट वाटणार नाही. आज सरकारकडे बहुमत नाही. त्यामुळे त्यांनी 19 आमदारांना निलंबित केले आहे. एक-दोन किंवा 5 आमदार निलंबित केले तर ठिक आहे. 19 आमदार निलंबित केले यावरुनच स्पष्ट होत आहे. त्यांच्याकडे बहुमत नाही. अर्थसंकल्प पास होण्यासाठी यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे त्यांनी ही सुडाची कारवाई केली आहे, असे राणे म्हणालेत.
विरोधकांशी चर्चा करणे सरकारचे काम आहे. विरोधकांची संख्या कमी करण्यासाठी आमदारांचं निलंबन करण्यात आले आहे. सरकारला अधिवेशन चालवायचे नाही. हे राज्य दिवाळखोरीकडे चालले आहे. काही कामानिमित्त मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, मी भाजपमध्ये जात आहे हे चुकीचे आहे, असे राणे म्हणालेत. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, मला कोणीही भेटले नाही, असे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले.
आज सरकार सर्वच ठिकाणी अपयशी ठरले आहे. कर्जमाफीवर बोलत नाही. शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. आज सर्वच भाव कोसळले आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. यावर सरकार बोलत नाही. केवळ राजकारण करण्यात हे सरकार गुंतले आहे, असे राणे म्हणालेत.