दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : शिवसेना मुखपत्र 'सामना' अंक जाळणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर कार्यकारी संपादक आणि पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सामना' धगधगत्या विचारांचा ज्वालामुखी असून अंक जाळणाऱ्यांनी हात पोळणार नाहीत ना याची काळजी घ्यावी असं राऊत यांनी म्हटलंय. 


तसेच कालच्या अंकात भाजपचे मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यशैलीचे कौतूक केलं असल्याने भाजप कार्यकर्ते नेमके कोणता अंक जाळत आहेत? असा उपहासात्मक सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय. 


भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱयांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे सध्या शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविरोधात हिंसक आंदोलन सुरू आहे.