COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन अ बिलियन ड्रिम्स' या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.


सचिनच्या 44व्या वाढदिवसाचं औचित्य साधून निर्मात्यांनी हे गाणं प्रदर्शित केलं. ए.आर.रहेमानने संगीतबध्द केलेल्या या गाण्यातून सचिनचा क्रिकेटचा प्रवास दाखविण्यात आला आहे.