मुंबई : सचिन तेंडुलकरने म्हटलंय, एकदा पुण्यावरून मुंबईत परतल्यानंतर रेल्वेस्थानकावरून घरी जाण्यासाठी कॅबला देण्यासाठी जवळ पैसेच नव्हते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमात बोलताना सचिनने हा किस्सा सांगितला, मी १२ वर्षांचा असताना मुंबईकडून १५ वर्षाखालील संघामध्ये माझी निवड झाली होती. संघात माझी निवड झाल्यामुळे मला खूपच आनंद झाला होता. 


सचिन ही आठवण सांगताना म्हणतो, त्या दिवशी पुण्यामध्ये तीन सामने होणार होते. काही पैसे आणि बॅग घेऊन पुण्याला गेलो होतो. मैदानात खेळण्यासाठी उतरलो तेव्हा ४ धावा केल्यानंतर धावबाद झालो. दुःखी मनाने ड्रेसिंग रूममध्ये येऊन खूप रडलो होतो. फलंदाजी करण्याची मला परत संधी मिळाली नव्हती. कारण, नंतर पावसाला सुरवात झाली होती.


दिवसभर पाऊस पडत असल्याने चित्रपट पाहणे आणि खाण्याशिवाय काहीच करता येत नव्हते. लहान असल्यामुळे पैसे कसे खर्च करावे, अथवा साठवून ठेवावे, याचे काही समजत नव्हते. मी, संपूर्ण पैसे खर्च केले होते. 


पुण्याहून रेल्वेने मुंबईत आलो, त्यावेळी खिशात काहीच पैसे शिल्लक नव्हते. दादर रेल्वे स्टेशनवर उतरलो होतो. जवळ दोन मोठ्या बॅगा होत्या. दोन बॅगा हातात घेऊन दादर रेल्वे स्टेशन ते शिवाजी पार्कपर्यंत चालत गेलो होतो. त्यावेळी माझी काय परिस्थिती झाली असेल, याचा तुम्ही अंदाज बांधा, असे तेंडुलकरने सांगितले.