नाशिक : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहासह सहा आरोपींना क्लिन चीट देण्यात आली. तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींवरचा मोक्काही हटवण्यात आला. काय आहे या घडामोडींचा अर्थ???


संजीव पुनाळेकर म्हणतात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सध्या तुरुंगवासात असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांचा सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झालाय. कारण, साध्वींसह ६ आरोपींना एनआयएनं म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं क्लिन चीट दिलीय. एनआयएनं शुक्रवारी विशेष न्यायालयात नवं आरोपपत्र दाखल केलं. त्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह शिवनारायण कालसंगरा, शाम साहू, प्रवीण टक्कलकी, लोकेश शर्मा आणि धनसिंग चौधरी यांची नावं आरोपपत्रातून वगळण्यात आलीत.


पुरेसे पुरावे नसल्यानं लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासह अन्य १० आरोपींविरूद्धचा मोक्काही हटवण्यात आलाय, अशी माहिती आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी दिलीय.  


आरोपींना 'एनआयए'ची क्लीन चीट


२९ सप्टेंबर २००८ ला मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ७ जणांचे बळी गेले, तर ७५ हून अधिक लोक जखमी झाले. या स्फोटांमागे हिंदुत्ववादी दहशतवाद्यांचा हात असल्याचा ठपका महाराष्ट्र एटीएसनं ठेवला होता. एटीएसनं दाखल केलेल्या आरोपपत्रात १६ जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आलं होतं. मात्र, २०११ मध्ये या स्फोटांचा तपास एनआयएकडं सोपवण्यात आला. आता एनआयएनं सबळ पुरावे नसल्याचं सांगत ६ आरोपींना क्लिन चीट दिलीय.


अलिकडेच २००६ मधल्या मालेगाव स्फोटांप्रकरणी ९ मुस्लिम आरोपींची एनआयएनं अशीच निर्दोष मुक्तता केली होती. आता २००८ च्या स्फोटांमध्येही ६ हिंदू आरोपींना क्लिन चीट देण्यात आलीय. मग एटीएस आणि एनआयएच्या तपासात एवढी तफावत का? या बॉम्बस्फोटांच्या निमित्तानं राजकारण खेळलं जातंय का? आणि हे बॉम्बस्फोट घडवले तरी कुणी? हे प्रश्न कायम उरतात.