COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकरला काही पुरूषांना नागडे करून रस्त्यावर फटके मारावेसे वाटतात, सईनं नुकतंच एका टॉकशोमध्ये असं म्हटलंय. या टॉक शोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या देखील सहभागी झाल्या होत्या. 


वंदना गुप्ते आणि सई ताम्हणकर यांनी यावेळेस आपल्या आवडी निवडी, तसेच जीवनातील चांगले वाईट प्रसंग लोकांशी शेअर केले. वंदना गुप्ते आणि सई ताम्हणकर यांचा फॅमिली कट्टा हा सिनेमा लवकरच येतोय, त्या अनुषंगाने या गप्पा होत्या.


मिथिला पालकरने हा कॅनडीड गप्पा हा शो होस्ट केलाय, त्यात सई ताम्हणकर आणि वंदना गुप्ते यांनी मनसोक्त आठवणी आणि विचार नेटीझन्सच्या समोर मांडले. मिथिला पालकरचा हा नवा शो भाडीपाच्या या आधीच्या शोपेक्षा निश्चितच वेगळा होता. भाडीपाचे आधीचे शो रटाळ वाटायला लागले होते, अशी नेटीझन्सची प्रतिक्रिया होती.