मुंबई : सैराट सिनेमा जिथं संपतो, तिथं सागरची गोष्ट सुरू होते. तो अवघा एक वर्षांचा असताना त्याच्या आईवडिलांचा खून झाला. त्यानंतर या बाळाची रवानगी झाली ती थेट अनाथाश्रमात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी नियमानुसार वयाच्या अठराव्या वर्षी तो बाहेर पडला. बाहेरच्या जगात कुठं जायचं, काय करायचं, काय खायचं असे अनेक प्रश्न आ वासून उभे होते. आत्महत्येचे विचारही त्याच्या मनाला शिवून जात होते. मात्र या निराशेवर त्यानं मात केली. तो इंजिनिअर झाला. बड्या कंपनीत बड्या पगाराची नोकरी मिळाली. 


आयुष्य व्यवस्थित सुरू होतं. मात्र एक दिवस त्याच्या आश्रमातल्या काही मुलींची अवस्था त्यानं पाहिली. इथून सागरचं आयुष्य बदललं. अठरा वर्षांनंतर बाहेर पडणा-या शेकडो मुलांचा सागरनं सांभाळ केलाय आणि करतो आहे. या कामासाठी त्यानं लाखो रुपये पगाराच्या नोकरीवरही पाणी सोडले. 


सागरच्या मुलाखतीचे खालील दोन भाग प्रत्येकानं आवर्जून पाहावेत असेच आहेत. ही मुलाखत पाहून तुमचं वैयक्तिक आयुष्य, तुमचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल. ही मुलाखत पाहून सागरच्या कामात काही हातभार लावावासा वाटला, तर त्यासाठी त्याचा संपर्क क्रमांक देत आहोत. मोबाईल नंबर - 09768117477.


जिंदगी मिलेगी दोबारा - भाग दुसरा 



जिंदगी मिलेगी दोबारा - भाग पहिला