मुंबई : अभिनेता संजय दत्तची येत्या शुक्रवारी म्हणजे २५ फेब्रुवारीला सुटका होणार आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी अवैध शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी संजय दतला 5 वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर 16 मे 2013 रोजी त्याला पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये उर्वरित शिक्षेसाठी पाठवण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत 8 महिने 18 दिवस अगोदरच जेलमधून बाहेर येतोय.  मे 2013 मध्ये संजय दत्तचा माफीचा अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला होता. पण संजय दतने 18 महिन्यांची शिक्षा अगोदरच भोगल्यामुळं त्याला केवळ 42 महिन्यांची शिक्षाच भोगायची होती. पण त्याची 14 महिन्यांची सुट्टी गृहित धरूनदेखील संजय दत 8 महिने 18 दिवस लवकर बाहेर येणार आहे. 


एकूण शिक्षा = ६० महिने 


सुट्ट्या = ७ दिवस दर महिना 


एकूण सुट्ट्या - ६० महिने  x ७ दिवस म्हणजे ४२० दिवस, म्हणजे एकूण = १४ महिने 


संजय दत्तने आर्थर रोड जेलमध्ये = १८ महिने शिक्षा भोगली आहे.


येरवडा जेल मध्ये = ४२ महिने शिक्षा भोगायची होती.


४२ महिमे वजा १४ महिने सुट्टी = म्हणजे फक्त २८ महिने संजय दत्तला जेल मध्ये रहायचे होते. 


- फर्लो सुट्टी = ४२ दिवस 
- पेरोल सुट्टी = ४ महिने


- एकूण सुट्ट्या  फर्लो + पेरोल = ५ महिने १२ दिवस एकूण सुट्ट्या संजय दत्त ने घेतल्या 
- प्रत्यक्ष कारावास = २८ महिने + ५ महिने १२ दिवस = म्हणजे ३३ महिने १२ दिवस सुट्ट्यांसह शिक्षा संजय दत्तने भोगली 


- येरवडा जेल मध्ये संजय दत्तची १६ मे २०१४ रोजी रवानगी करण्यात आली. त्यानुसार जर संजय दत्तने पर्लो आणि पॅरोलच्या सुट्ट्या घेतल्या नसत्या तर तो १५ सप्टेबंर २०१५ रोजीच शिक्षा पूर्ण करुन बाहेर आला असता. पण, त्याने पर्लो, पॅरोल, आणि मासिक सुट्ट्या घेतल्याने ४२ महिने शिक्षा नुसार संजय दत्त १५ नोव्हेंबर २०१६ रोजी जेल बाहेर येणं अपेक्षित होते. पण त्याआधीच तो बाहेर येत असल्याने नेमक्या कोणत्या कारणांमुळे संजय दत्त ८ महिने १८ दिवस आधीच जेल बाहेर येत आहे. या कारणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.