नवी मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली. सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं. त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज त्याचाच परिपाक दगडफेकीत झाल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे ठाण्यातील नितीन कंपनी जवळील श्रीजी आरकेड इमारतीतील पहिल्या मजल्यावर सामना दैनिक कार्यालयावर अज्ञातानी शाईफेक केली. सामना पेपर मधील व्यंग्यचित्रप्रकरणी ही शाईफेक करण्यात आली.


संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. संभाजी ब्रिगेडने एक पत्रक काढलं आहे. या पत्रकात सामनातून महिलांची अवहेलना झाल्याने निषेध सामनाचा निषेध करत असल्याचं म्हटलं आहे.