मुंबई : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी एकच असण्याची शक्यता आहे. दोघांच्याही हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल एकच होतं, असं बलास्टिक अहवालात समोर आल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिलीय. एवढंच नव्हे तर त्यांच्या हत्येआधी रेकी करण्यासाठी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची होंडा कंपनीची बाईक ही वीरेंद्र तावडेच्या मालकीची होती, अशी माहिती सीबीआयनं मुंबई हायकोर्टात दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी डॉक्टर नरेंद्र तावडेच्या विरोधात सीबीआयला ठोस पुरावे मिळाले असून, हत्येत वापरलेली काळ्या रंगाची हाँडा कंपनीची बाईक ही विरेंद्र तावडेची होती आणि स्वत: विरेंद्र तावडे हा ती बाईक २२ जानेवारी २०१३ रोजी विरेंद्र तावडे पनवेल ते पुणे सारंग अकोलकरकडे घेवून गेला होता. त्या बाईकचा वापर करुन सारंग अकोलकर याने दाभोळकरांची रेकी केली. असा संशय सीबीआयला आहे. धक्कादायक बाब म्हणजे विरेंद्र तावडेच्या बाईकचा वापर करुनच गोविंद पानसरे यांची रेकी करण्यात आली. पण या दोन घटनेच्या नंतर ही बाईक मात्र पुन्हा परत आलीच नाही. तसच नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या करण्याकरता वापरण्यात आलेले पिस्तुल हे एकच होते असा बलास्टिक अहवालात समोर आल्याची माहिती सुत्रांनी दिलीये.


२३ जून रोजी मुंबई उच्च न्यायलायात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान सीबीआय ही माहिती मुंबई उच्च न्यायालयात देणार आहे. वाशी, ठाणे आणि गोवा येथे अयशस्वी बॉम्बस्फोट झाल्याने हिंदू विरोधी लोकांची हत्या करण्याचे म्हणजे शूट टू कीलचे ट्रेनिंग रुद्र पाटील, जयप्रकाश अण्णा, प्रविण निमकर, विनय पवार, सारंग अकोलकर आणि तावडे यांनी मिळून घेतले. हे ट्रेनिंग तीन पोलीस अधिका-यांनी त्यांना दिले होते. त्यानंतर दाभोळकरांची हत्या केल्याचे सीबीआय तपासात उघड झालय. 


विरेंद्र तावडेवर सीबीआयला संशय कसा आला ? 


- साक्षीदार संजय साढवीलकर याने दिलेल्या साक्षीनंतर विरेंद्र तावडे याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात सीबीआयने सुरुवात केली. याच दरम्यान २००९ साली गोवा येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर स्फोटात मरण पाठवलेल्या मलगोंडा पाटील याने बॉम्बस्फोट करण्याआधी ४ वाजून ३६ मिनिटांनी विरेंद्र तावडेला फोन केला होता. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता गोवा येथे बॉम्बस्फोट करण्यात आला. सारंग अकोलकरने ५-६ कॉल विरेंद्र तावडेला केले होते. त्यामुळे विरेंद्र तावडे वरील सीबीआयचा संशय बळावला कारण दाभोलकर यांची हत्येत सारंग आकोलकरचा हात असल्याचे एटीएस आणि एनआयए यांच्या तपासात ही समोर आले होते. 


सीबीआयच्या हाती ठोस पुरावे :


- २ जून रोजी विरेंद्र तावडेच्या घरी तपास केल्यानंतर विरेंद्र तावडेच्या त्याच्या घरातून जप्त केलेल्या लॅपटापमध्ये राक्षस या कोडवर्डमध्ये असेलेली यादी सीबीआयला मिळाली असून, त्याच यादीत नरेंद्र दाभोळकर यांचे नाव होते.
- २२ जानेवारी २०१३ रोजी विरेंद्र तावडे स्वत:ची स्प्लेंडर बाईक पनवेल ते पुणे येथे सारंग अकोलकरकडे घेवून गेला होता.
- विरेंद्र तावडेच्या बाईकवरुनच सारंग आकोलकर याने सनातनच्या काही साधकांबरोबर मिळून दाभोळकरांची रेकी केली होती.
- शिवाय दाभोळकर आणि पानसरे हत्येत एकच पिस्तूल वापरण्यात आले होते हे नवीन बॅलॅस्टीक अहवाल वरुन स्पष्ट झाले आहे.
- रुद्र पाटील, जयप्रकाश अण्णा, प्रविण निमकर, विनय पवार, सारंग अकोलकर आणि तावडे या ६ जणांना मिळून  ११९ बँक अकाऊंट वापरले.
- तसंच एकमेकांच्या संपर्कात राहण्याकरता या ६ जणींना तब्बल १६९ मोबाईल नंबरचा वापर केला होता. तावडेच्या अटके आधी पर्यंत सारंग आकोलकर पुण्यातच होता ! 
- सारंग अकोलकर मार्च २०१६ पर्यंत पुण्यातील त्याच्या घरात रहायचा.
- सारंग अकोलकरच्या घरी सीबीआयने छापा टाकला तेव्हा त्याच्या घरात चालू महिन्याचे म्हणजे मार्च महिन्याचे वीज बिल सापडले होते.
- सारंग अकोलकर त्याच्या पुण्यातील घरी यायचा हे देखील तो राहत असलेल्या सोसायटीवाल्यांनी सीबीआयला कन्फर्म केलंय.