मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी चर्चेत आलेली 'सनातन संस्था' पुन्हा एकदा चर्चेत आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महिला मंदिरातील फरशीवर झोपल्यानं त्याना मुलं होतात' असा दावा 'सनातन प्रभात' या सनातनच्या मुखपत्रात करण्यात आलाय. 


सनातन प्रभातचा लेख

इतकंच नाही तर ही गोष्ट म्हणजे, अंनिसला चपराक असल्याचंही त्यांनी आपल्या या लेखात म्हटलंय. 'देशात सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. देवींची मंदिरे भाविकांनी फुलून गेली आहेत. असेच एक मंडी जिल्ह्यातील सिमस गावात सिमसा माता देवीचे मंदिर आहे. ही देवी अपत्यहीन महिलांची मनोकामना पूर्ण करणारी म्हणून संतान दात्री या नावाने ओळखली जाते. या ठिकाणी नवरात्रोत्सवात संतान प्राप्तीसाठी पंजाब, हरियाणा, चंदीगड, तसेच देशातील अनेक भागांतून जोडपी येत असतात. या मंदिरातील फरशीवर महिला झोपून रहातात आणि त्यांना अपत्यप्राप्ती होते, असे सांगितले जाते. या मंदिराचे कोडे अद्याप विज्ञानालाही उलगडता आलेले नाही' असं या लेखात म्हटलं गेलंय.