मुंबई : सर्व महाविद्यालयं आणि शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगानं दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत मनसे महिला सेनेनं कांदिवलीच्या स्वामी विवेकानंद विद्यालयात सॅनिटरी नॅपकिन वेन्डिंग मशीन बसवलं. बॉ़लीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांनीही या उपक्रमाचं खास कौतुक केलं. 


खरं तर राष्ट्रीय महिला आयोगानं सप्टेंबर २०१४ मध्ये सर्व कॉलेजेस आणि शाळांना एक पत्र पाठवलं. विद्यार्थिनींच्या कॉमन रुममध्ये सॅनिटरी नॅपकीनचे वेन्डींग मशीन्स लावावे, अशा सूचना आयोगानं दिल्या होत्या. मात्र या सूचनेकडे राज्य सरकार गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचा आरोप मनसे महिला सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केलाय.  


दोन वर्षांत काही मोजक्या शाळा-कॉलेजमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेन्डिंग मशिन्स बसवण्यात आलीत. पण सगळीकडेच या वेन्डीग मशीन्सची गरज असल्याचं विद्यार्थिनी सांगतात. मुलींच्या आरोग्याच्या बाबतीत आपण किती सजग आहोत, याची कल्पना यावरून येईल.