मुंबई : राज्यात ऑटोरिक्षांचे परवाने मिळवण्यासाठी चालकाला किमान मराठीचे ज्ञान आवश्यक असण्यासंबंधीचा निर्णय वाहतूक मंत्र्यांनी घेतला होता. त्यानंतर या निर्णयावरुन वादही सुरु झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या वादात काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनीही उडी घेतलीये. रिक्षाचालकांना मराठीच्या तोंडी परीक्षेची अट नको, असे एक निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे.


'भाषेच्या नावावर परवाने देताना भेदभाव केला जाऊ नये, असे राज्यघटनेत नमूद केले असून, यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रिक्षा परवान्यांसंदर्भात भाषेची सक्ती करणे रास्त नसल्याचे म्हटले असल्याचे,' निरुपम यांनी म्हटले आहे.


मराठी भाषेचे कामापुरते ज्ञान आवश्यक असताना आरटीओतील अधिकारी मात्र उगाच कठीण प्रश्न विचारुन परवाने मिळण्यापासून लोकांना दूर ठेवत असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला आहे. 


लॉटरीमध्ये परवाने मिळवण्यासाठी ज्यांचे नाव आले आहे त्यांना परवाना द्यावा आणि आरटीओतर्फेच मराठीची शिकवणी सुरू केली जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.