दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरणी न्यायाधीश बदलण्याची मागणी
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्यातल्या आरोपींचे वकील संजीव पुन्हाळेकर यांनी धक्कादायक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्ये मुख्य न्यायमुर्ती मंजूला चेल्लूर यांच्याकडे केलीय.
मुंबई : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्यातल्या आरोपींचे वकील संजीव पुन्हाळेकर यांनी धक्कादायक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्ये मुख्य न्यायमुर्ती मंजूला चेल्लूर यांच्याकडे केलीय. मुंबई उच्च न्यायालयात दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी सध्या न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या न्यायालयात सुरु आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या न्यायालयात घेतली जाऊ नये असा युक्तीवाद संजीव पुन्हाळेकर यांनी केलाय.
याकरता पुन्हाळेकरांनी सत्यरंजन धर्माधिकारी यांचे वडील निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी आणि नरेंद्र दाभोलकर यांच्यातल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा दाखला दिलाय. चंद्रशेखर धर्माधिकारी आणि दाभोलकर यांच्यात नियमित पत्रव्यवहार झाल्याचा पुरावाही आपल्याकडे असल्याचा दावा पुन्हाळेकर यांनी केलाय.
कायद्याच्या दृष्टीकोनातून संजीव पुन्हाळेकर यांचा युक्तीवाद योग्य असल्याची चर्चा न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे पुन्हाळेकरांच्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती मंजूला चेल्लूर काय निकाल देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.