मुंबई : भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी मजबूत होणार आहे. देशातील स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण होणार आहे. यामुळे स्टेट बँकेला मोठा फायदा होणार आहे, बँकेची कार्यक्षमता वाढेल, अशी आशा केंद्र सरकारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पाच बँकांच्या विलीनीकरणामुळे देशाची बँकिंग व्यवस्था बळकट होईल. तसंच बँकिंग क्षेत्राची कार्यक्षमता आणि फायदा, दोन्हींमध्ये वाढ होईल, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.


स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ जयपूर अँड बिकानेर या स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण होणार आहे.


दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया आकाराच्या दृष्टीने जागतिक स्तरावरची एक मोठी बँक बनली आहे. सहयोगी बँकांतील सर्व ग्राहकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एसबीआयच्या सर्व सुविधांचा फायदा मिळणार आहे. मात्र भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.