एसबीआयमध्ये पाच दिवसांत जमा झाले 83,702 कोटी रुपये
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेत पाच दिवसांत तब्बल 83,702 कोटी रुपये जमा झालेत.
मुंबई : केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेत पाच दिवसांत तब्बल 83,702 कोटी रुपये जमा झालेत.
एसबीआयमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 10 ते 14 नोव्हेंबरच्या पाच वाजेपर्यंत 4,146 कोटी रुपयांच्यां जुन्या नोटा बदलल्यात. सोमवारी गुरुनानक जयंतीमुळे अनेक राज्यातील बँका बंद होत्या. मात्र पूर्वेतील काही राज्यांमध्ये बँका सुरु असल्याने तेथे नोटा जमा करण्यास लोकांची गर्दी होती.
गेल्या पाच दिवसांत बँकांच्या विविध शाखांमध्ये 5 तब्बल 83,702 कोटी रुपयांच्या 500 आणि 1000च्या नोटा जमा झाल्यात. याआधी काल भारतीय बँक संघाने म्हटले होते की गेल्या तीन दिवसांत बँकांनी 30,000 कोटी रुपयांच्या दोन हजार रुपये आणि इतर नोटा वितरित केल्यात.