मुंबई : शाळेची भिंत कोसळून पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शहरातील अॅण्टॉपहील येथे शाळेच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटतेवेळीच अचानक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीचा स्लॅब कोसळला. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात तीन जण जखमी झालेत. मुस्कान खान असे मृत चिमुरडीचे नाव असून ती केजीमध्ये शिकत होती. सायन कोळीवाडा परिसरात मुस्कान आई वडीलांसोबत राहायची. जी.टी.बी. नगरच्या सनातम धर्म हायस्कुलमध्ये शिशूवर्गात शिकत होती.


मुस्कानला शाळेतून घरी नेण्यासाठी आलेली आई आणि मुस्कान त्यात जखमी झाली. त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, आईच्या कुशीत अडकलेल्या मुस्कानने आधीच प्राण सोडले होते. त्यांना तत्काळ सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे मुस्कानला मृत घोषित करण्यात आले. तर आईवर उपचार सुरु आहेत. त्यांच्यासह अन्य दोन विद्यार्थी यामध्ये जखमी झाले.