मुंबई-गोवा हायवेसोबत सागरी मार्गही होईल - गडकरी
अत्याधुनिक मुंबई -गोवा हायवे बरोबरच सागरी महामार्गाचे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात दिलीय . राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.
मुंबई : अत्याधुनिक मुंबई -गोवा हायवे बरोबरच सागरी महामार्गाचे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात दिलीय . राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.
मुंबई -गोवा आणि गोवा मेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाचे सर्व साधनसुविधांसह चौपदरीकरण करण्यात येत आहे . यातल्या राष्ट्रीय महामार्ग १७ मधील पत्रादेवी ते पणजी आणि पणजी ते बांबोळी या मार्गच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला.
यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री लक्षमिकांत पार्सेकर उपस्थित होते . या एक हजार ३०२ कोटींच्या कामाचा शुभांरभ प्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले महाराष्ट्र आणि गोव्याच्या विकासाच्या दृष्टीने मुंबई - गोवा या महामार्ग महत्वाचा आहे.
अत्याधुनिक सुविधा असणारा हा महामार्ग बनविणायचे काम आता जोरात सुरु झाले आहे . २०१८ पर्यंत ते पूर्ण होईल . त्याबरोबरच मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे कामही हाती घेण्यात येणार आहे.
एकूण २२ फेज मधील या कामांपैकी १८ ची कामे सुरु आहेत . या मार्गात २२ उडडन पूले येत असून देवास - करंजा या सागरी ब्रिज चे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय .