सेल्फी पॉईंटचा वाद संपुष्टात, मूळ जागा मनसेकडे
मुंबईतल्या सेल्फी पॉईंटबाबत मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेला वाद संपुष्टात आला आहे. आता शिवाजी पार्कमध्ये तीन सेल्फी पॉईंट असणार आहेत.
मुंबई : मुंबईतल्या सेल्फी पॉईंटबाबत मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेला वाद संपुष्टात आला आहे. आता शिवाजी पार्कमध्ये तीन सेल्फी पॉईंट असणार आहेत.
यातला मूळ सेल्फी पॉईंट हा मनसेकडे असणार आहे. तर त्याच्याच काही अंतरावर भाजपचा सेल्फी पॉईंट असेल आणि स्काऊट पॅव्हेलियनच्या बाहेर शिवसेनेचा सेल्फी पॉइंट असेल. सेल्फी पॉईंटवरून या तिन्ही पक्षांनी सामंजस्यची भूमिका घेतल्यामुळे हा तोडगा निघाला. जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा वाद संपला.