मुंबई : पाच राज्यातल्या निकालानंतर प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारात आज कमालीची उसळी बघायला मिळतेय. सेन्सेक्स उघडताच 500 अंकांनी वधराला असून निफ्टीमध्येही 150 अंकांची उसळी बघायला मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशात, उत्तराखंडात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालयं. त्यामुळे आता केंद्रातल्या मोदी सरकारला आणखी शक्ती मिळणार आहे. आर्थिक सुधारणांचे निर्णय आता आणखी वेगानं आणि प्रभावीपणे घेतले जातील अशी बाजाराची आशा आहे.


त्यामुळेच बाजार आज वधारलाय. आज सरकारी आणि खासगी बँका, इंजिनिअरिंग कंपन्या, भांडवली वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी बघायाला मिळत आहे.