मुंबई विमानतळावर लाखोंची रोकड आणि सोनं जप्त
मुंबई कस्टम्स विभागानं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सात किलोहून जास्त सोनं जप्त केलं आहे.
मुंबई : मुंबई कस्टम्स विभागानं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सात किलोहून जास्त सोनं जप्त केलं आहे. सोन्याच्या विटा, नाणी अशा स्वरुपात हे सोनं होतं. सुमारे दोन कोटी रुपये किंमतीचं हे सोनं आहे. यासोबतच साडे सात लाखांची रोकड असलेली एक बेवारस बॅगही कस्टम्सनं जप्त केली आहे.
जेट एअरवेजच्या छत्तीसगडमधल्या रायपूरहून आलेल्या विमानातून हा मुद्देमाल शुक्रवारी जप्त करण्यात आला. या प्रकरणी नवरतन गोलेछाला अटक करण्यात आली. न्यायालयानं त्याला 9 डिसेंबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.