शरद पवार `काय बोलले` की निवडणुका लागतात?
शरद पवार मध्यावधी निवडणुका होणार असं म्हणतात, म्हणजे मध्यावधी निवडणुका होणार नाहीत.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मध्यावधी निवडणुका होणार असं म्हणतात, म्हणजे मध्यावधी निवडणुका होणार नाहीत.
शरद पवार जे बोलतात त्याचं नेमकं उलट होतं, असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे.
शरद पवार जेव्हा बोलतात, तेव्हा नेमकं त्याच्या उलट होतं, ही पवारांची गुगली असते, असं चंद्रकांतदादा यांनी झी २४ तासशी बोलताना म्हटलं आहे.
म्हणजेच शरद पवार जेव्हा म्हणतील की राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत, तेव्हा मध्यावधी निवडणुका लागतील असं हा अंदाज असल्याचं म्हटलं जातं.