मुंबई : शेअर बाजारात या आठवड्याची सुरुवात पडझडीनं झाली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स 522 अंकांनी आपटला. तर निफ्टीमध्ये 160 अंकांची घसरण पाहायला मिळाली.


भारतीय रुपयाही आज 20 पैशांनी घसरत प्रति डॉलर 66 रुपये 88 पैशांवर स्थिरावला. शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आजची घसरण ही शेअर बाजार तज्ज्ञांना अपेक्षितच होती. आयटी वगळता इतर सर्व सेक्टर्सना या घसरणीचा फटका बसलाय. सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजार काहीसा सावरला असला, तरी बहुतांश इंडिकेटर्स आज लाल रंगच दाखवत आहेत.