मुंबई : उच्चभ्रू कफ परेड परिसरातली मेकर टॉवरच्या विंगला लागलेली आग, आता पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगीच्या भडक्यातून 11 जणांची सुटका करण्यात आलीय. त्यात बजाज इलेक्ट्रिकल या देशातल्या बड्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज आणि त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश आहे.   


दरम्यान या आगीत दोन जणांचा मृत्यू झालाय. आगीत बजाज यांच्या 8 बीएचके घराची पार राखरांगोळी झालीय.  सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेल्या याआगीवर अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून दोन तासात आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं.  


वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळच्या  मेकर टॉवरच्या विसाव्या मजल्यावर ही आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या. त्याचप्रमाणे 6 जंबो टँकर आणि एक रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली होती.