शिवसेना - भाजप युतीबाबत पहिली ठिणगी, फरफटत जाणार नाही!
महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याबाबत शिवसेनेचा मूड नसल्याचेच संकेत मिळत आहेत. शिवसेना - भाजप युतीबाबत पहिली ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
मुंबई : महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याबाबत शिवसेनेचा मूड नसल्याचेच संकेत मिळत आहेत. शिवसेना - भाजप युतीबाबत पहिली ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
पक्षाच्या प्रचाराची स्वतंत्रपणे जाहिरात सुरु केल्यानंतर शिवसेनेनवं युतीसाठी भाजपमागे फरफटत जाणार नाही असे महत्वाचे विधान केलंय...शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी झी चोवीस तास शी केलेल्या एक्स्लुझिव बातचीतीत भाजपच्या सत्तेच्या दबावापुढे शिवसेना झुकणार नाही असेही म्हटलेय.
तसेच मुंबई महापालिकेत पाच वर्षे शिवसेनेचाच महापौर असेल, त्याबाबत वाटाघाटी होणार नाहीत अशी भूमिका मांडलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेल्या पारदर्शकतेपेक्षा शिवसेनेचा विश्वास आरपारच्या लढाईत असल्याचं स्फोटक विधान राऊत यांनी केले आहे.