मुंबई : अखंड महाराष्ट्राच्या ठरावावर मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही शिवसेना ठाम राहली. त्यामुळे भाजपला शिवसेनेकडून कोंडी पकडण्याचा प्रयत्न झाल्याने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी युतीत तणाव दिसून आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखंड महाराष्ट्रचा ठराव विधानपरिषदमध्ये मांडण्याबाबत ठाम राहण्याचे आदेश आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना दिले आहेत. दरम्यान विधानपरिषदेचं कामकाज याच मुद्द्यावरून तहकूब करण्यात आलंय. 


मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठरावाबाबत मवाळ होण्याची विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती. शिवाय चर्चा पुढच्या अधिवेशनात घेण्यास तयार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या ठरावाबाबत सरकारकडून अद्याप तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याची मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली. त्यामुळे भाजप कोंडीत सापडला आहे. 


दरम्यान, विधानपरिषद सभागृहात संयुक्त महाराष्ट्राच्या ठरावावर चर्चेसाठी ठाम राहण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना दिलेत. हे भाजपला कोंडीत पकडण्यासाठीच हा ठराव आणला जात असल्याचं बोललं जातयं.