मुंबई : राज्यात एक नंबरचा पक्ष म्हणून भाजपला मान्यता मिळाली असली तरी शिवसेनेच्या मदतीशिवाय त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही, हेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 8 जिल्हा परिषदेत हात मिळवणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेतील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यापुढे भाजपशी युती नाही, अशी टोकाची भूमिका शिवसेनेने घेतली होती. मात्र, सत्तेसाठी पुन्हा भाजपशीच हात मिळवणी केल्याचे दिसत आहे. 


25 जिल्हा परिषदेपैकी पाच ठिकाणी शिवसेना आणि भाजपची स्वबळावर सत्ता येईल. तसेच युती झाल्यामुळे आणखी 8 जिल्हा परिषदेमध्ये ते सत्ता काबीज करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर समितीची बैठक झाली. यात उर्वरित 8 जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेसोबत युतीचा निर्णय झाला.