बोरिवली : बोरिवलीत मनसे नगरसेवक चेतन कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला आणखी एक मोठा धक्का बसलाय. चेतन कदम मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे सदस्य होते. चेतन कदम यांनी शिवसेनेच्या गळाला मोठा मासा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेतन कदम यांचे बोरिवली भागात चांगला वचक आहे. तसंच विकास कामे करणारा नगरसेवक अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांचा जुना वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला आहे.


मात्र या वॉर्डातून त्यांची पत्नी निव़डणूक लढवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेना नगरसेवक विश्वास घाडीगावकर यांनी मनसेत प्रवेश केलाय. आपल्याला डावलून बाहेरून आलेल्या काँग्रेसच्या इच्छुकाला तिकीट दिल्यामुळं घाडीगावकर नाराज होते.