मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याची वेळ जशी जवळ येतेय, तसतशी पक्षांमध्ये नाराजी आणि बंड उफाळून आलंय...मुंबईत शिवसेनेत सकाळपासून तीव्र नाराजी पसरलीय. दादर, वडाळा, लालबाग-परळ भागातल्या शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पसरलीय.  दादार, वडाळाल्यात शिवसेनेच्या शाखांना टाळी ठोकण्यात आलीय. तर काही महत्वाच्या नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय.


पाहा कुठे आहे विरोध... कोण आहे बंडोबा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना अँटोप हिल वॉर्ड क्रमांक 174 ( सर्वसाधरण महिला ) खामकर यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध केला. 


जनसंपर्क नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याचा आरोप केला जात आहे. 


महिला शाखाप्रमुख सविता कांबळे यांच्यासह मोठ्या संख्यने महिला शिवसैनिक मातोश्री बाहेर दाखल...


 


वरळी वॉर्ड 195 मध्ये शिवसेना माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 


दरम्यान, शाखाप्रमुख जीवबा केसरकर भाजपात दाखल झाले आहेत.  मंत्री प्रकाश मेहता यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 



डिलाईल रोड, आर्थर रोड वॉर्ड नंबर 199 मध्ये शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे. 


स्थानिक शिवसैनिक 'मातोश्री' वर दाखल झाले असून या ठिकाणी बंडाचे झेंडे उभारले जाऊ लागले आहे. 


शाखाप्रमुख राजेश कुसळे यांच्या पत्नी रुपल, किंवा महिला शाखा संघटक लक्ष्मी सावंत यापैकी एकाला संधी द्यावी. वॉर्डाबाहेरचा उमेदवार लादू नये, अशी  शिवसैनिकांची भावना असल्याचे मातोश्रीवर दाखल झालेल्या शिवसैनिकांनी सांगितले. 


उद्धव ठाकरे यांची भेट मिळाल्याशिवाय जाणार नाही, शिवसैनिकांची भूमिका व्यक्त केली आहे. 


 


 शिवसेना प्रवक्ते अरविंद भोसलेही नाराज. १९६ मधून लढण्यासाठी होते इच्छूक. परंतु तेथून विभागप्रमुख आशिष चेंबुरकर यांनी स्वत:साठी उमेदवारी मिळवली आहे. 


 - १९५ मधून महापौरांना उमेदवारी दिल्यानं स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत. यामुळं सुमेर केंद्राजवळच्या शाखेला टाळे ठोकल्याचं समजतंय.


 
घाटकोपर पंतनगर ( वॉर्ड १३१ ) येथून भाजपातून आलेल्या मंगल भानुशाली यांना उमेदवारी दिल्यानं स्थानिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी. स्थानिक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना मेल करून व्यक्त केली नाराजी


बंडोबा....


 सेनेचे वॉर्ड क्र 144, अणुशक्ती नगरचे विद्यमान नगरसेवक दिनेश उर्फ बबलू पांचाळ भाजपात दाखल झाले आहे.  


आता या वार्डमध्ये खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना सेनेने तिकीट दिले आहे. त्यामुळे  दिनेश पांचाळ, वार्ड 144 मधील सेना नगरसेवक, थोड्या वेळेत भाजप मध्ये प्रवेश करणार आहे. 


महापौरांना एबी फॉर्म नाही..


महापौर स्नेहल आंबेकरांना अद्याप एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. त्यांनी १९८ मधून उमेदवारी मागितली आहे.