शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उद्या मुंबईत राज्यव्यापी बैठक
आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांची राज्यव्यापी बैठक बुधवारी मुंबईत होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लोकप्रतिनधी आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असणार आहे.
मुंबई : आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांची राज्यव्यापी बैठक बुधवारी मुंबईत होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लोकप्रतिनधी आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असणार आहे.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने युती होणार की नाही, याची उत्सुकता शिगेला आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेतील टीका पाहता ही शक्यता कमीच दिसत आहे. मात्र, शिवसेनेच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत काय होणार याकडेही लक्ष आहे.
आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या दृष्टीनं शिवसेनेची पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची राज्यव्यापी बैठक वांद्रे पूर्व येथील रंगशारदा सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे लक्ष असणार आहे.
महापालिका निवडणूकीत युती व्हावी अशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे, मात्र त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारा आडून भाजपनं शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवातही केलीय.दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते स्वबळाची भाषा करताहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेची ही राज्यव्यापी बैठक चांगलीच गाजणार याबाबत शंका नाही. रंगशारदा सभागृह त्यासाठी सज्ज झासले आहे.