मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कोकणातील संघर्षयात्रेशी आपला काहीही संबंध नसल्याचे राणे म्हणालेत. त्याचवेळी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. सत्तेत राहून बाहेर पडण्याची ते भाषा करत आहेत. मात्र, सेनेचे 17 आमदार भाजपसोबत सत्तेत राहतील, असा गौप्यस्फोट केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणे यांना सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी भेटण्यासाठी दिल्लीला बोलावल्याच्या बातम्या आल्यानंतर राणे यांची नाराजी दूर होणार का, अशा बातम्या येत होत्या. मात्र राणे यांनी पुन्हा काँग्रेसवर टीका केलेय.  काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेय. 


दरम्यान, ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी नारायण राणे यांना टोला लगावलाय. जे काँग्रेस सोबत इमानदारीने राहू शकत नाही. त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसमध्ये येऊच नये.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी नारायण राणे यांना टोला लगावलाय. जे कॉंग्रेस सोबत इमानदारीने राहू शकत नाही. त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसमध्ये येऊच नये, असे म्हटलेय.


शिवसेना सत्तेतून पायउतार होण्याची केवळ चर्चा आहे. मात्र, शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सेनेचे १७ आमदार हे सत्तेतच राहतील, असेही राणे म्हणाले. २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेच्या हातात फक्त काठी उरेल झेंडा गायब झालेला असेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.