शिवाजी महाराज स्मारकाचे भूमीपूजन एप्रिलच्या अखेरीस : विनायक मेटे
अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमीपूजन एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमीपूजन एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच याची घोषणा करतील, अशी माहितीही मेटेंनी दिलीय. या स्मारकाचं काम प्रोजेक्ट मॅनेज कन्सल्टन्सी म्हणजेच पीएमसी करणार आहे, असे ते म्हणालेत.
आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रियेतून या कंपनीची निवड करण्यात आल्याचे मेटे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेऊन त्यांच्या हस्ते भूमीपूजन करण्याचा प्रयत्न असणार आहे. याबाबत आज शिवस्मारक समितीची बैठक झाली, असे त्यांनी सांगितले.