मुंबई : शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या आग्र्यातल्या महालातून स्वतःची सुटका करून घ्यायला आज साडे तीनशे वर्ष पूर्ण होताय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सन 1666च्या मे महिन्यात शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात महाराजांना कैद करण्यात आलं. त्यानंतर तब्बल चार महिने महाराज मुघलांच्या नजर कैदेत होते. 


महाराजांनी आजारपणाचं नाटक करून अनेक दिवस फळांचे पेटारे दान म्हणून पाठवत असल्याचा बनाव रचला आणि अशाच एका फळांच्या पेटाऱ्यातून मुघल सैनिकांच्या हातावर तुरी देऊन महाराष्ट्र गाठला. 


मुघलांनी लिहून ठेवलेल्या घटनाक्रमानुसार 17 ऑगस्ट 1666 हाच तो दिवस होता. त्यामुळे आज आग्राहून महाराजांच्या सुटकेला बरोबर साडे तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आग्र्यात काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.