आरेतील मेट्रो कारशेडवरून सेना-भाजपमध्ये पुन्हा वाद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेची झाडे कापली जाणार आहेत का? याची मी माहिती घेणार असून त्यात विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेची झाडे कापली जाणार आहेत का? याची मी माहिती घेणार असून त्यात विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं.
मुंबईकरांना स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी देणारी प्रत्येक गोष्ट हवी आहे असं सांगत राजकारणातही अलीकडे प्रदुषण झालं आहे. राजकारणातील प्रदुषण साफ करणारं मशीन आपल्याकडे आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. तर भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचा सगळ्या बाजूने कोंडमारा झाला असून बाळासाहेब नसल्याने शिवसेना हवा नसलेला गोळा झाल्याचं त्यांनी सांगितलं.