COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी गेल्या 10 दिवसांत जागा वाटपाच्या मुद्द्यावर झालेल्या 3 जोर-बैठकांमध्ये काहीही निष्पन्न न झाल्याने शिवसेना-भाजप युतीच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गोरेगाव येथील नेस्को संकुलात आयोजित पक्षाच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात युतीच्या भवितव्यावर आपली परखड भूमिका स्पष्ट करण्यासाठी उभे आहेत. या ऐतिहासिक मेळाव्यासाठी शिवसेनेनं शक्तीप्रदर्शनाची वातावरण निर्मिती केलीय.


उद्धव ठाकरे म्हणतात... 


- मुंबई : गोरेगावमध्ये उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसमोर भाषणासाठी उपस्थित


- जमलेल्या माझ्या तमाम माता, बंधुंनो आणि भगिनींनो... - उद्धव ठाकरे 


- माझ्या मनात काय आहे हे शिवसैनिकांनी ओळखलं आहे आणि तुमच्या मनात काय आहे हे मी ओळखलं आहे - उद्धव ठाकरे 


- विषय अनेक मुद्दा एकच - उद्धव ठाकरे 


- हिंमत असेल समान नागरिक कायद्याचा वटहुकूम काढा - उद्धव ठाकरे


- ऑफिसात पुजेवर बंदीचा फतवा कशासाठी?


- उधळलेल्या बैलाला वेसण घालावीच लागेल - उद्धव ठाकरे 


- कसल्या पारदर्शकतेच्या गप्पा करता?


- अध्यादेश काढण्यापूर्वी आमच्या मंत्र्यांना विचारलं का?


- देवांच्या तसबिरी काढण्याचा फतवा कशासाठी


- निर्णय मागे घ्या नाहीतर होळी करू... 


- आता राम मंदिराची आठवण झाली?


- शिवसेनेला अंधारात ठेवून अध्यादेश काढला


- शिवसेना प्रमुख म्हणायचे धर्म आपापल्या घरात ठेवा आणि बाहेर पडताना देश हाच आपला धर्म... निधर्मीपणा आम्हाला पण मान्य आहे, पण तो सगळ्यांसाठी असावा


- पक्षात घेतलेले गुंड मावळे होऊ शकत नाहीत


- कामं करून मतं मागतो, थापा मारून नाही


- शिवसेना मुंबई-ठाणे जिंकणारच - उद्धव ठाकरे


- उद्धव ठाकरेंची भाजपवर मर्मभेदी टीका... टीकेचा स्वर स्वबळावर लढण्याकडे


- माझ्या घरात घुसून मारणार असाल, तर मी पंचारती करु का


- शिवसेनेला वज्रमुठ द्या, दात पाडायचं काम मी करेन


- सत्ता नशिबात असेल तर शिवराय, शिवसेनाप्रमुख, शिवसैनिक ते देतील, पण सत्तेसाठी झुकणार नाही 


- गेली 25 वर्ष युतीत सडली - उद्धव ठाकरे


- मुंबईत शिवसेना - भाजपची युती तुटली


- ठाकरेंनी केली नवीन वाटचालीची घोषणा


- भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकावणार - उद्धव ठाकरे


- शिवसेना महापालिका स्वबळावर लढणार


- युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाही - उद्धव ठाकरे


- भविष्यात कधीही युती होणार नाही - उद्धव ठाकरे


- मुंबईत शिवसेना भाजप युतीचा पोपट मेला