मुंबई : शिवसेना भाजपमध्ये युतीसंदर्भात आज पुन्हा चर्चा होणार आहे. जागावाटपासंदर्भात आज अनिल देसाई आणि विनोद तावडे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा बोलणी सुरू करण्याचं ठरले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, त्याआधी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झालीय. भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र ठरवलेली डेडलाईन आज संपतेय. गेल्या आठवड्यात भाजप सेनेच्या पहिल्या बैठकीच्यावेळी दोन्ही पक्षांनी चर्चा जास्त ताणली जाऊ नये, शेवटच्या दिवसापर्यंत वेळकाढू पणा होऊ नये यासाठी 21 जानेवारी ही डेडलाईन ठरवली होती.


विधानसभा निवडणुकीच्या वेळी चर्चा ताणली जाऊन उमेदवारी अर्ज भरतांना उमेदवारांची जास्त धांदल उडाली होतीच, पण त्याहीपेक्षा दोन्ही पक्षांमध्ये कटुता चांगलीच टोकाला गेली होती.  उमेदवारी अर्ज भरायला आता जेमतेम आठवडा उरलाय. 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी हे उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे.


मात्र आज भाजप सेनेची डेडलाईन संपत असतांना साधी यादी एकमेकांना देण्याची प्रक्रिया सुद्धा झालेली नाही. त्यामुळे आज काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.