जिल्हा परिषदेत सेना-भाजप एकत्र
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. स्थानिक पातळीवर शक्य असेल तिथे शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे. बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी उपस्थित होते. मुंबईत सेनेला सत्ता देण्याचा निर्णय भाजपानं घेतला असला तरी राज्यातील जिल्हा परिषदबाबत काय करायचे याबाबत चर्चा झाली.
मुंबई : भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. स्थानिक पातळीवर शक्य असेल तिथे शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे. बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी उपस्थित होते. मुंबईत सेनेला सत्ता देण्याचा निर्णय भाजपानं घेतला असला तरी राज्यातील जिल्हा परिषदबाबत काय करायचे याबाबत चर्चा झाली.
जिल्ह्यात नंबर वन असूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या सांगली, कोल्हापूर, जालना, औरंगाबाद, गडचिरोली, बुलढाणा,जळगांव सारख्या जिल्हा परिषदबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत आढावा चर्चा झाली. तर यवतमाळ, नाशिक, हिंगोली सारख्या जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापनेसाठी सेनेला साथ देण्याबाबत चर्चा झाली.