मुंबई : मुंबईत सेल्फीपाठोपाठ आता पेंग्विन प्रदर्शनाच्या तारखेवरून राजकारण रंगलंय. पेंग्विन प्रदर्शनाचे उदघाटन 6 मार्चला करण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. मात्र भाजप यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेंग्विन प्रदर्शन असलेल्या ठिकाणी हवा आणि पाण्याचा अहवाल योग्य आहे. मात्र हा अहवाल नकारात्मक असल्याची भासवून भाजप हे उद्घाटन पुढं ढकलण्याची खेळी करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. 


काहीही झाले तरी शिवसेनेचाच महापौर या प्रदर्शनाचं उदघाटनं करणार असल्याचा निर्धार शिवसेनेनं व्यक्त केलाय. महापौरांनी आयुक्तांना पत्र लिहून ६ मार्चला उदघाटन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आता यावरून राजकारण रंगल्य़ानं उदघाटनं पुढं ढकललं जाणार का याकडं लक्ष लागलंय.