मुंबई : मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची महत्वाची बैठक उद्या संध्याकाळी ४ वाजता शिवसेना भवनात होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे सर्व नेते आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक बैठकीला उपस्थीत रहाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची रणनीती ठरणार आहे. मुंबईत सत्ता स्थापनेविषयी अजून विचार केलेला नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलंय.


एका पक्षावर सलग पाचव्यांदा नंबर एकचा पक्ष होणं फार मोठे कर्तृत्व आहे. शिवसैनिकांनी ते करून दाखवलंय. मुंबईकरांनी विश्वास दाखवलाय त्यांचं ऋण फेडायचं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. बहुमताच्या आकड्यासाठी जेव्हा प्रयत्न होतील तेव्हा सांगू असंही शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हटलंय.