मुंबई : जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. जिल्हा पातळीवर भाजप सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी इतर सर्व पक्ष एकवटले आहेत. जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी आता हालचालींना वेग आला आहे.


शिवसेना नेते आणि संपर्कप्रमुखांना जिल्हापरिषदेवर आपला अध्यक्ष बसवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करण्याचे पक्षाने आदेश दिले असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी बिनशर्त पाठींबा दिल्याने परतफेड म्हणून पुणे आणि पिंपरी - चिंचवड महापालिकेत शिवसेना भाजपला पाठिंबा देणार आहे.