मुंबईकरांना 2012ला दिलेल्या आश्वासनांचा शिवसेनेला विसर
आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेनं वचननामा प्रसिद्ध केला आहे.
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेनं वचननामा प्रसिद्ध केला आहे. 'जे बोलतो ते करून दाखवतो' अशी टॅगलाईन या वचननाम्याला देण्यात आली आहे. पण 2012 सालच्या शिवसेनेच्या वचननाम्याकडे बघितलं तर शिवसेना जे बोलतं ते करून दाखवतं का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 2012साली शिवसेनेनं दिलेल्या वचननाम्यातली अनेक आश्वासनं अजून पूर्ण झालेली नसल्याचं चित्र आहे.
असा होता शिवसेनेचा 2012 सालचा वचननामा
गारगाई-पिंजाळ पाणी प्रकल्प उभारणार, सद्यस्थिती- प्रकल्प अजूनही अपूर्ण
एसी बसेस वाढवण्याचं वचन, सद्यस्थिती- एसी बसेस वाढल्या नाहीत तर कमी झाल्या
धूळमुक्त मुंबईचंही दिलं होतं आश्वासन
महापालिकेची क्रिकेट अकादमी सुरू करणार, सद्यस्थिती- ही अकादमी अजून सुरू झाली नाही
मलःनिस्सारण प्रकल्प उभारणार, सद्यस्थिती- हा प्रकल्प अजूनही अपूर्णच
कच-यापासून वीजनिर्मिती प्रकल्प अजून कागदावरच
राणीच्या बागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय नाहीच
पवई उद्यान परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालं नाही
हॉकर्स ग्राऊंड अजून विकसित नाही
मुंबईरत्न, मुंबई भूषण पुरस्कार अजून सुरू झाले नाहीत
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची बरीचशी कामे अद्याप अपूर्ण आहेत