मुंबई : पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. उद्धव ठाकरेंनी महापालिकेचा 20 वर्षांचा ऑडिट रिपोर्ट वेबसाईटवर टाकण्याचा खुलं आव्हान भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच नव्हे तर शिवसेनेतल्या काही बड्या नेत्यांनी मनी लॉण्डरिंगही केल्याचा खळबळजनक आरोपही सोमय्यांनी केलाय. यातल्या सात कंपन्यांची नावंही सोमय्यांनी घोषित केली असून यापैकी दोन कंपन्यांमध्ये भुजबळांची गुंतवणूक असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. सोमय्यांच्या आरोपांमुळं भाजप-शिवसेनेतील संघर्ष आणखीनच पेटणार असल्याचं दिसतंय.