मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोघांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. मात्र, येथील वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाच्यावेळी शाब्दीक जुगलबंदी पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युतीतील तणातणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी एकाच व्यासपीठावर आले होते. दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडण्याच्या कार्यक्रमाचे होते निमित्त. चांगल्या कामासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन, असे सांगत उद्धव यांनी भाजप नेत्यांना योग्य तो संदेश दिला.


 


मी या कार्यक्रमाला येणार का, असा प्रश्न मला विचारण्यात आला. त्यावेळीच मी कार्यक्रमाला जाणार असल्याचे स्पष्ट केले. मी इथे अपशकून करायला आलेलो नाही. चांगल्या कामाच्या पाठिशी आम्ही निश्चितच आहोत. गरज पडली तर तुमच्या खांद्याला खांद लावून उभा राहीन, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी लावलेल्या रोपट्याला मी माती आणि खत घातले आहे. हे रोपटे आम्ही वटवृक्षामध्ये परिवर्तित करू आणि संपूर्ण महाराष्ट्र हरित करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.