मुंबई : एखादं चुकीचं ट्विट कधी कुणाची मदत करून जाईल सांगता येत नाही. पण ते ट्विट खिल्ली उडवणारं असू नये. निवडणुकीच्या दिवशी ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असं ट्विट करत त्याखाली एका स्थुल पोलिसाचा फोटा टाकला. हे खिल्ली उडवणारं ट्विट त्या जाड पोलीसापर्यंत पोहचलं आणि मग काय झालं... पहा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दौलतराम जोगावत मुंबईत आलेयत. ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांच्या ट्विटमुळे चर्चेत आलेल्या जोगावतांना मोफत उपचारांसाठी भरपूर जणांनी मदत देऊ केली. पण त्यांनी निवड केली मुंबईतल्या सेंटर फॉर ओबेसिटी ऍन्ड डायजेस्टिव्ह सर्जरीची. दोलतराम जोगावत हे मध्यप्रदेशमध्ये राहतात. निवडणुक काळात शोभा डे यांनी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असं ट्विट करत जोगावतांचा फोटोही ट्विट केला होता.  


डे बाईंचं ट्विट वायरल झाल्यानंतर नेटीझन्स आणि पोलीसही दोलतराम जोगावतच्या मदतीला धावून आले. मुंबई पोलिसांनीही शोभा डे यांना चोख उत्तर दिलं. कुणाच्या जाडेपणाची अशी खिल्ली उडवू नये. दोलतराम जोगावत हे मुंबईचे पोलीस नाहीत असंही मुंबई पोलिसांनी ट्विट केलं. काही दिवसांतच या बातम्या दोलतराम जोगावत यांच्यापर्यंत पोहचल्या. 


डे बाईंचं ट्विट पाहून जोगावत यांना वाईट वाटलं. त्यांनी डे बाईंना थेट सवाल केलेय. कुणी हौशीनं जाड होत नाही, आजारपणामुळे मी जाड झालोय. येवढीच काळजी वाटतेय तर माझ्या उपचारांचा खर्च तुम्ही उचलणार का. दरम्यान मुंबईतल्या डॉ मुफज्जल लकडावाला यांनी 180 किलो वजनाच्या जोगावत यांच्यावर उपचार करण्याचं ठरवलं. हे तेच डॉक्टर आहे ज्यांनी काही दिवसांपूर्वीच इजिप्तच्या 500 किलो वजनाच्या अमानवर उपचार सुरू केलेयत. 


स्थुल व्यक्तीची कधीही खिल्ली उडवू नये, हा एक आजार आहे आणि सध्याच्या जीवनशैलीमुळे भारतात स्थुल व्यक्तींचं प्रमाण वाढत चाललंय, त्यामुळं यावर सरकारनं गांभिर्यानं विचार करायला हवा. यासाठीची औषधं बाजारात स्वस्तात उपलब्ध होतील याकडे सरकारनं लक्ष द्यायला हवं असंही यावेळी डॉ लकडावाला यांनी म्हटलंय.