मुंबई : वेगवेगळे ब्रॅन्डेड ब्रेडमध्ये घातक रासायनांचा वापर करत असल्याचे एका अहवालात समोर आलेले आहे. मात्र या अहवालाने ब्रेड विक्रीवर मात्र फरसा परिणाम झालेला दिसत नाही. मात्र, भविष्यात होईल अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रेड-विक्रेते आणि डिलर यांच्या माहितीनुसार सध्यातरी ब्रेड विक्रीत घट आलेली नाही. पण येत्या काही दिवसात ब्रेड विक्रीवर परिणाम होण्याची भीती मात्र व्यक्त होतेय. दोन दिवसांपूर्वी दिल्लीतल्या सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हिरोनमेंटनं केलेल्या तपासणीत दिल्लीत ८३ टक्के कंपन्यांच्या ब्रेडमध्ये कॅन्सरला पोषक अशी दोन रसायनं आढळून आली आहेत. 


त्यानंतर केंद्र सरकारनं FSSAI मार्फत तपासणीचे आदेश दिले आहेत. शिवाय राज्यात अशी कुठलीही तक्रार नसली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी याप्रकरणी नमुन्याची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.