`श्री कल्पना क्लब`ची `गुजराथी थाळी`
दक्षिण मुंबईच्या झवेरी बाजारात काळबा देवी परिसरात, न्यू सट्टा गल्लीत अप्रतिम गुजराथी जेवण मिळतं.
मुंबई : दक्षिण मुंबईच्या झवेरी बाजारात काळबा देवी परिसरात, न्यू सट्टा गल्लीत अप्रतिम गुजराथी जेवण मिळतं, श्री कल्पना क्लबची ही गुजराथी थाळी प्रचंड लोकप्रिय आहे.
हे दक्षिण मुंबईतील जुन्या गुजराथी हॉटेलपैकी एक आहे, १९५० साली हे हॉटेल सुरू झालं.
दोन स्वीट डिशसह दाल ढोकला, आणि असे अनेक गुजराथी मारवाडी पदार्थांचा आस्वाद तुम्हाला येथे घेता येतो.
सामान खरेदीच्या निमित्ताने दक्षिण मुंबईत आलेले लोक, तसेच नियमित येणारे ग्राहकही या थाळीचा आनंद घेतात. कल्पना क्लबच्या गुजराथी थाळीला दक्षिण मुंबईत मानाचं स्थान आहे.