मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने द्विशतक केलं. श्रेयसनं भारत अ संघासाठी नाबाद २०२ धावांची खेळी केली. ब्रेबॉर्नवरील ३  दिवसीय सराव सामन्यात श्रेयसने ही कामगिरी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७ चौकार आणि सात षटकांच्या जोरावर , श्रेयसने २१० चेंडूत २०० धावा केल्या. सातव्या विकेटसाठी श्रेयसनं कृष्णप्पा गौतमसह  १३८ धावांची भागीदारीही रचली.यानंतर भारत अ संघाला पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारता आली.


श्रेयसनं याआधी बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यातही १०० धावांची खेळी केली होती.


या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ४६९तर दुसऱ्या डावात ११० धावा केल्या. त्यामुळं हा सामना अपेक्षेप्रमाणेच अनिर्णित राहिला. मात्र त्यातल्या शानदार खेळीसह श्रेयसनं पुन्हा बीसीसीआयच्या निवड समितीचं दार ठोठावलं आहे.