मुंबई :अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या भूमिपुजन कामाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपकडून रितसर निमंत्रण देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन हे निमंत्रण दिले. आमच्यात कोणतेही अंतर नाही.दिलजमाई हा शब्द तेव्हाच येतो जेव्हा अंतर निर्माण झालेलं असते. शिवसेना भाजपमध्ये अंतर नाहीच. अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपुजनाचं  निमंत्रण दिलं, उद्धव ठाकरेंनी ते स्विकारले, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यक्रम आहे, म्हणून मी गेलो होतो, या भागातील पालकमंत्री म्हणून विनोद बरोबर होते. पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरे प्रत्यक्ष जलपुजन कार्यक्रमात असतीलच. सर्व प्रकारचा सन्मान उद्धव ठाकरेंना दिला जाईल, असे ते म्हणालेत.


दरम्यान, पंकजांवर केलेले आरोप निराधार आहेत हे CM आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. माहितीं अधिकारमध्ये मिळालेल्या अर्धवट माहितींवर विरोधकांनी आरोप केले होते. क्लिनचिटनं हे सिद्ध केले आहे. विरोधकांना मुद्दे नाहीत, म्हणून असे निराधार आरोप करत असल्याचा प्रतिआरोप पाटील यांनी यावेळी केला.