मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले वचन पूर्ण करत मुंबईच्या सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी 'गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम'मध्ये ४४ किलो सोने जमा केले आहे. मंदिराच्या ट्रस्टने गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये याची घोषणा केली होती. 


पंतप्रधानांच्या अपीलनंतर जमा केले सोने 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, सोन्याला वितळविण्याचे काम सरकारी टकसाळमध्ये करण्यात येत आहे. या सोन्यावर मंदिराला दरवर्षी २.२५ टक्के व्याज मिळणार आहे. हे सोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांमध्ये ठेवण्यात येईल. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सोन्याचा भांडार वाढविण्यासाठी गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम सुरू केली आहे. त्यात भारत सोने आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. 


चॅरीटीवर खर्च करणार व्याजाची रक्कम 


सोन्यावर मंदिरांना दर महिन्याला १० लाख रुपये व्याज मिळणार आहे. मंदिर ट्रस्टचे सीईओ संजीव पाटील म्हणाले व्याजातून मिळालेल्या रकमेतून चॅरीटी करण्यात येणार आहे. याचा उपयोग डायलिसिस, तसेज गरजू रुग्ण आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. 


किती आहे सिद्धिविनायक मंदिराकडे सोने...


सध्या सिद्धिविनायक मंदिराकडे १७१ किलो सोने आहे. तसेच यापूर्वी १० किलो सोने स्टेट बँकेकडे जमा आहे.